जगण्याशी रोज दोन हात करणाऱ्या फाटक्यातुटक्या माणसालाही चार हत्तींचं बळ जमवून विपरीत परिस्थितीशी कसं झुंजता येतं, याची प्रचिती देणारं आत्मचरित्र!
या आत्मकथेच्या पानापानांवर एका प्रांजळ माणसाचं दर्शन होतं. मास्तरांना अनेकांनी जीवनातून उठवण्याचा प्रयत्न केला. राजकीय वैर धरलं. दूरच्यांनी धरलं, तसं जवळच्यांनीही धरलं. ते कधी राजकीय युक्त्या - प्रयुक्त्यांचेही शिकार झाले. पण या साऱ्या समरप्रसंगांत ते डगमगले तर नाहीतच, परंतु त्यांनी त्याविषयी कधी कटुताही मनात धरली नाही. शक्य असूनही त्यांनी धनाच्या राशी जमवल्या नाहीत. जमवली मानवी संपत्ती.......